आजपासून मणिपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे.मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचारामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. हिंसाचारानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन एकदिवसाचेच असणार आहे.कुकी समुदायाच्या 2 मंत्र्यांसह 10 आमदारांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.तर कमिटी ऑफ ट्रायबल युनिटी (COTU) आणि इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) यांनी मणिपूर विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याबद्दल निषेध केला आहे.
सध्याची परिस्थिती कुकी आमदारांच्या सहभागासाठी अनुकूल नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी अधिवेशन घेण्याची विनंती राज्यपालांकडे केली होती, पण त्यांनी त्याला मंजुरी दिली नव्हती. अधिवेशनात हिंसाचाराच्या मुद्यावरून सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.
या बाबत काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनीही विरोध दर्शवला आहे. एक दिवसाचे अधिवेशन बोलवल्याबद्दल ओकराम म्हणाले, ‘ज्या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते, त्या दिवशी इतर कोणत्याही कामावर चर्चा होत नाही, असा माझा अनुभव आहे.