दैनंदिन जीवनातील वस्तूंचे भाव कमी करण्यासाठी मोदी सरकारने नवीन पाऊल उचलले असून आज गॅस सिलेंडरचे दर तब्बल २०० रुपयांनी कमी केले आहेत. याचा फायदा कोट्यवधी जनतेला होणार आहे. सध्या घरगुती गॅसचे दर २०० रुपयांनी तर उज्वला योजनेतील गॅस ४०० रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅसचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाली.
गेल्या काही दिवसात गॅस सिलेंडरच्या दारात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी वाढत असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान उद्या रक्षाबंधन असून मोदी सरकारने देशातील कोट्यवधी महिलांना गॅसचे दर कमी करून रक्षाबंधनाचे गिफ्ट दिले आहे!