आज रक्षाबंधन! भावा-बहिणीच्या नात्यातला अतूट विश्वास साजरा करण्याचा दिवस. या निमित्ताने शहरातील बाजारपेठा बहरल्या आहेत. विविध प्रकारच्या राख्या त्याचबरोबर भेटवस्तूंनी दुकानात रेलचेल केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळते. अगदी एक रुपयापासून ते दोनशे अडीचशे रुपयांपर्यंतच्या रेखीव राख्या दुकानांमध्ये उपलब्ध असून आवडीनुसार बहिणी आपल्या भावांसाठी राख्या खरेदी करत आहेत.