अजित पवार हे गेल्या काही दिवसांपूर्वी मविआ सोडून महायुतीत सामील झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे राज्याचे अर्थ खाते असून उपमुख्यमंत्रीपदाची धुराही ते सांभाळत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांनी घेतलेल्या साखर कारखानदारीच्या कर्जविषयक निर्णयाला देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लावला आहे. अजित पवार यांनी एनसीडीसीने मंजूर केलेल कर्ज साखर कारखानदारांना मिळण्यासाठी जाचक अटी घातल्या होत्या त्या आज देवेंद्र फडणवीसांनी मागे घेतल्या आहेत.
एनसीडीने मंजूर केलेले कर्ज घेण्यासाठी साखर कारखानदारांच्या जमिनीवर बोजा चढवावा असा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता त्यामुळे साखर कारखानदारांची मोठी अडचण झालेली पाहायला मिळाली होती. आता हाच निर्णय मागे घेण्यात आला आहे. दरम्यान सरकारमधील अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी हा पहिला प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.