दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी म्हणजे 7 लोक कल्याण मार्गावर आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. याठिकाणी विविध शाळांमधील मुली उपस्थित होत्या. या सर्वांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. त्यानंतर पंतप्रधानांनी या मुलींसोबत ग्रुप फोटो देखील काढला.या मुलींना भेटून पंतप्रधान मोदी आनंदित झाले तसेच पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून देशवासियांना देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
” माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बहीण आणि भावामधील अतूट विश्वास आणि अपार प्रेमाला समर्पित असलेला रक्षाबंधनाचा हा शुभ सण आपल्या संस्कृतीचे पवित्र प्रतिबिंब आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात स्नेह, सौहार्द आणि सौहार्दाची भावना प्रगल्भ करील अशी मी इच्छा व्यक्त करतो ” असे ट्विट करत पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.