शासकीय आदेश काढत शिंदे फडणवीस सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले आहे. गोविंदांच्या विम्यासाठी एकूण १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. आता अतिरिक्त २५ हजार गोविंदाना राज्य सरकारचे हे विमा कवच मिळणार आहे.या निर्णयानंतर आता एकूण ७५ हजार गोविंदाना सरकार कडून विमा कवच मिळणार आहे. याबाबत सर्व आवश्यक प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश काढून राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
गोविंदांसाठी राज्य सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे.दरम्यान, गेल्या वर्षी गोविंदा आणि गोविंदा पथकांसंदर्भात राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यापैकी काही निर्णयांची आता राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दहीहंडीची तयारी राज्यभरात वेगाने सुरु झाली आहे .या पार्श्वभूमीवर सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास हे शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे.