संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपन्न झालेले असताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यामध्ये १० हून अधिक महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. पण ही विधेयके कोणती असतील किंवा या अधिवेशनात नेमका काय अजेंडा असेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, हे संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून यामध्ये ५ बैठका होणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात होत असलेल्या या विशेष अधिवेशनात फलदायी चर्चा आणि वादविवाद होण्याची अपेक्षा आहे.” असे प्रल्हाद जोशी म्हणाले आहेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चालले होते. मात्र यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावरून दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता .आणि कामकाज फारसे पुढे जाऊ शकले नव्हते