केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. १७ सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छ्त्रपती संभाजीनगरात येणार असून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकार मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.मात्र पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीबाबत अजून खात्रीशीर वृत्त समोर आलेले नाही.