विरोधी आघाडीची एकत्रित बैठक आज मुंबईत पार पडली . या बैठकीवर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळते. ‘ही बैठक इंडियाची नसून घडामोडींची आहे तुम्ही ज्याला गरुड झेप म्हणत आहात ती गरुड झेप नसून मोदींच्या मानगुटीवर बसण्याचा तुम्ही करत असलेला प्रयत्न आहे.’ अशी जहरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. दरम्यान विरोधी आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरेल असे बोलले जात आहे.
विरोधी पक्षाच्या आजच्या बैठकीवर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामध्ये आता देशातील सर्व नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार का? असं सवालही दीपक केसरकर यांनी विचारला आहे.