केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतील ईएसआयसी(कर्मचारी राज्य विमा महामंडळ) मुख्यालयात आयोजित महामंडळाच्या 191 व्या बैठकीत देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ केला.
या सेवेचा प्रारंभ हे देशाच्या अमृत काळात आपल्या श्रमयोगींच्या सर्वांगीण कल्याणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल असल्याचे यादव याप्रसंगी म्हणाले. ईएसआयसी रुग्णालयांतर्गत केमोथेरपी सेवा सुरू झाल्यामुळे, विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावरील अवलंबित कुटुंबीयांना कर्करोगावर अधिक चांगले उपचार सुलभ होतील.
केंद्रीय मंत्र्यांनी ईएसआयसीच्या डॅशबोर्डसह नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन केले. ईएसआयसी रुग्णालयांमधील संसाधने आणि खाटा, चालू बांधकाम प्रकल्पांची सद्यस्थिती इत्यादींवर अधिक चांगली देखरेख डॅशबोर्डमुळे सुनिश्चित होईल.
ईएसआयसी रुग्णालयांमध्ये कुशल वैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कार्य पुढे नेण्याचा निर्णय ईएसआयसीने घेतला आहे, अशी माहिती यादव यांनी दिली. आवश्यकतांचे आकलन केल्यानंतर नवीन ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये स्थापन केली जातील. आतापर्यंत, 8 वैद्यकीय महाविद्यालये, 2 दंत महाविद्यालये, 2 नर्सिंग कॉलेज आणि एक पॅरा-मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात आली असून ती ईएसआयसीकडून चालवली जात आहेत, असे यादव यांनी सांगितले.
Extremely delighted to have launched Chemotherapy Services in 30 ESIC Hospitals across India during the 191st meeting of the ESI Corporation.
The launch is a step in the direction of realising PM Shri @narendramodi ji’s vision of all-round welfare of our Shram Yogis in India’s… pic.twitter.com/FDlG12UBAr
— Bhupender Yadav (@byadavbjp) August 31, 2023
Chaired the 191st meeting of the ESI Corporation at ESIC Headquarters in New Delhi.
Inaugurated a Control Room with Dashboards of ESIC. The dashboards will ensure better monitoring of resources and beds at ESIC hospitals, current status of ongoing construction projects, etc.… pic.twitter.com/IPGbuDQKZv
— Bhupender Yadav (@byadavbjp) August 31, 2023
The 191st meeting of the ESI Corporation decided that to ensure the availability of skilled medical professionals in ESIC Hospitals, ESIC will take further its work in the field of medical education.
The new ESIC Medical Colleges and Hospitals will be established after assessing… pic.twitter.com/495V5nQTSv
— Bhupender Yadav (@byadavbjp) August 31, 2023