‘सनातन धर्माचा समूळ नॅश करायचा आहे, हा धर्म, डेंगू मलेरियासारखा आहे’ असे बेताल आणि सामाजिक संतुलन बिघडवणारे वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या पुत्राने केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते पुढे म्हणाले- सनातन म्हणजे काय. सनातन हा शब्द संस्कृतमधून आला आहे. हे समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. सनातनचा अर्थ शाश्वत आहे, म्हणजे बदलता येत नाही. ज्यावर कोणीही प्रश्न करू शकत नाही.
उदयनिधी स्टॅलिन यांच्याशिवाय द्रमुकच्या इतर अनेक नेत्यांनीही सनातन उन्मूलन संमेलनाला हजेरी लावली होती. यात तामिळनाडू सरकारमधील मनुष्यबळ विकास मंत्री पीके शेखरबाबू हेही उपस्थित होते. पीके शेखर बाबू तामिळनाडूतील प्राचीन हिंदू मंदिरांवरही नियंत्रण ठेवतात.