जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण आल्यानंतर आंदोलनकर्त्यांकडून एसटीची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. यात जवळपास १९ बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर अली आहे. यामुळे एसटीचे तब्ब्ल चार कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्याने दिली. आज जालन्यात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.
जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथे मराठा आंदोलक उपोषणाची बसले होते. त्या दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली, पुढे या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. दरम्यान याचे पडसाद राज्यभरात उमटले असून आज रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात अली आहेत.