जालन्यातील मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे
जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथे मराठा आंदोलक उपोषणाची बसले होते. त्या दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली, पुढे या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. दरम्यान याचे पडसाद राज्यभरात उमटले असून आज रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात अली आहेत.