देशभरात ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ तत्वासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून देशात सध्या या तत्वाची प्राथमिक चाचपणी सुरु आहे. या समितीमध्ये काँग्रेसचे माजी नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षाचे नेते गुलाब नबी आझाद समाविष्ट असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आठ सदस्यांच्या स्थापन केलेल्या समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना का स्थान नाही? याची विचारणा काँग्रेसकडून करण्यात अली आहे.
दरम्यान ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ तत्वाला महाराष्ट्रातून आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला असून अनेक नेत्यांनी विरोधही केला आहे. तेच चित्र संपूर्ण देशभरात आहे.