शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, तालुक्याच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
शिरुर तालुक्यातील कवठे, म्हसे बुद्रुक, माळवाडी आणि वडनेर बुद्रुक येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन श्री.वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनिता गावडे , माजी पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, कवठे येमाईच्या सरपंच सुनिता पोकळे, म्हसेचे सरपंच सौरभ पवार , वडनेरच्या सरपंच शिल्पा निचित, आण्णापुरचे सरपंच किरण झंजाड आदी उपस्थित होते .
Tags: NULL