सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल या सहा राज्यांतील ७ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हे मतदान होणार आहे. केंद्रात असणाऱ्या सत्ताधारी भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया या काँग्रेस प्रणित आघाडीसाठी हा पहिला आणि महत्वाचा टप्पा असणार आहे.. झारखंड मधील डूमरी, केरळ मधील पुतूपल्ली , त्रिपुरातील बॉक्स नगर , धनपूर उत्तराखंड मधील बागेश्वर उत्तर प्रदेशातील घोसी आणि पश्चिम बंगाल मधल्या धूपगुरी या जागांवर आज मतदान होत आहे.आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
झारखंड, त्रिपुरा व उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये ‘इंडिया’चा संयुक्त उमेदवार असून केरळ व पश्चिम बंगालमध्ये घटक पक्षांमध्ये लढत होत आहे.इंडिया आघाडी उत्तर प्रदेशातील घोसी, झारखंडमधील डुमरी, त्रिपुरातील धनपूर-बॉक्सनगर आणि उत्तराखंडमधील बागेश्वर मतदारसंघातून एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. तर पश्चिम बंगालमधील धुपगुरी आणि केरळमधील पुथुपल्ली येथे आघाडीचेच घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणुकांच्या या जागांसाठी ८ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.