राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने काल त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. सरकारकडून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विधेयक आणण्याबाबतच्या शक्यता पडताळल्या जाणार असून .विधेयकाबाबत एकमत झाल्यास सरकार एक दिवसीय अधिवेशन बोलवणार चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा लवकर सोडवावा,प्रसंगी विधेयक आणावे असा सूर सरकारमधील मंत्र्यांकडून ऐकू येत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला होता. यावरून राज्यात राजकारण तापले आहे.