तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ‘सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.उदयनिधीं आणि प्रियांक खरगेंवरही धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका भाषणात बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती .तर दुसऱ्या दिवशी कर्नाटक सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनीही उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले यावरून देशभरातून मोठा गदारोळ झाला होता आणि या दोघांविरुद्ध संतापाची लाट उसळली होती.
या दोघांविरुद्ध आता उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ वकील हर्ष गुप्ता आणि राम सिंह लोधी यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत रामपूर येथे हा एफआयआर दाखल केला आहे.रामपूरचे एसपी अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, “दोन्ही नेत्यांविरुद्ध कलम 153A, 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.