नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी धार्मिक प्रतिकांचे महत्व पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले होते गणपती ही बुद्धीची देवता आहे. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही चांगल्या कामाचा श्रीगणेशा हा गणपतीचे स्मरण करुन केले जाते. याच पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीचा मुहूर्त हा नव्या संसदेच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी निवडण्यात आला आहे.
१८ सप्टेंबर रोजी संसदेच्या जुन्या इमारतीत विशेष अधिवेशनाला सुरवात होणार आहे मात्र 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेच्या नवीन इमारतीत उर्वरित विशेष अधिवेशन पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. एक देश एक निवडणूक यासह विशेष अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मोदी सरकारकडून मंडळी जाणार आहेत असे वृत्त समोर आले आहे.