श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे.राज्यात सर्वत्र दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. थरावर थर लावत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दहीहंडी पथकांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारही हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडमधील तसेच मराठी कलाकारही ठिकठिकाणी हजेरी लावत आहेत.
मुंबईत मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्या बघायला मिळतात.
मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीसाठी शिवसेना, भाजप, मनसे आणि ठाकरे गट अशा सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.ह्या दहिहंड्याच्या माध्यमातून राजकीय पक्ष जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात.
राज्यभरात गोविंदांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कार्यक्रमावेळी काही गोविंदां जखमी होतात त्यावेळी त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
दरम्यान, यंदा मुंबईत जवळपास १७ हजार ते १८ हजार दहीहंड्या उभारल्या जाणार असल्याचे चित्र आहे. या दहीहंड्या फोडण्यासाठी केवळ मुंबईत सुमारे ९०० गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. साधारणपणे आठ थरांची दहीहंडी उभारणारे गोविंदा पथक घराबाहेर पडल्यावर गाडी, गोविंदांचे दिवसभराचे जेवण, त्यांना लागणारे टी शर्ट आणि अन्य गोष्टींचा खर्च अडीच ते तीन लाख रुपयांवर जातो. दरवर्षी हा खर्च भागविण्यासाठी गोविंदा पथकांना मदत गोळा करावी लागते. बऱ्याचदा राजकीय पक्षांकडून ही मदत दिली जाते.
https://www.youtube.com/watch?v=xKi1oJ70Fmw
ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली असून , गोविंदा पथक येण्यास झाली सुरुवात झाली आहे. मुंबई ठाण्यातली मानाची हंडी म्हणून या उत्सवाला मानाचे स्थान आहे. गोविंदाचे प्रत्येक पथक इथे येऊन सलामी देऊन मगच पुढे जातात धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा उत्सव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित करत आहेत
ही दहीहंडी पहा LIVE https://www.youtube.com/watch?v=l2pcYCzb1rw
ठाण्यात मनसेच्या दहीहंडीची जोरदार चर्चा सुरु आहे. अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडीसाठी जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार आहेत. तर राज ठाकरे संध्याकाळी 6 वाजता येतील आणि त्यांच्या उपस्थितीत जय जवान गोविंदा पथक 10 थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत
भाजपच्या वतीने मुंबईमध्ये यावर्षी 400 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. लालबाग येथील साईबाबा पथ येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडीला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.
https://www.youtube.com/watch?v=xvgU47FZd28
घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारी हंडीची भारतातील सर्वात मोठी दहीहंडी अशी ओळख आहे. यंदा देखील या ठिकाणी मुंबईतील विविध पथक येऊन सलामी देत आहेत. दिवसभर विविध राजकीय नेते आणि सेलिब्रिटी देखील या ठिकाणी हजेरी लावतात. आज सकाळपासूनच पावसाने देखील हजेरी लावल्याने गोविंदाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
नागपुरात बडकस चौक मित्र परिवारातर्फे गोकुळाष्टनिमित्त आयोजित दहीहंडी स्पर्धेत आठ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.दहीहंडी फोडण्यासाठी थरांचा थरार सुरु होता. यावेळी गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची ही चुरस पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अखेर सहा थरावर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही काही वेळ उपस्थित होते..
पुण्यात काही मानाच्या आणि महत्वाच्या दहीहंडी आहेत. त्यात बाबूगेनू, दगडूशेठ मंडळ, मनसेची महिला दहीहंडी मंडळ, अकरा मारुची चौक आणि खजिना विहीर दहीहंडी मंडळ या पाच मंडळांचा समावेश आहे.या पाचही ठिकाणी जल्लोष करण्यासाठी पुणेकर मोठी गर्दी करतात. दरवर्षी या दहीहंडीचे वेगळेपण बघायला मिळते.
पुण्यात गणपती, दहीहंडी किंवा कोणतीही मिरवणूक ढोल ताशांच्या जल्लोषाशिवाय पुर्ण होत नाही त्यामुळे या महोत्सवात देखील सगळे ढोल ताशा पथके या जल्लोषासाठी सज्ज झाली आहेत.
पुण्यातील भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि आणि मानाचा तिसरा गणपती असणाऱ्या गुरुजी तालीम मंडळाने एकत्र येत भव्य दहीहंडी उत्सव चालू केला आहे. ह्या वर्षी त्यांचे दुसरे वर्ष असणार आहे.