मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आज सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा दाखल झाले होते. बंद लिफाफा अर्जून खोतकर यांच्याकडून जरांगे यांना देण्यात आला मात्र तोही अमान्य करत मनोज जरांगे आपण उपोषणावर ठाम राहणार असल्याचे सांगितले
शासकीय निर्णयात ‘सरसकट मराठा-कुणबी’ आणि ‘तत्काळ’ हे दोन शब्द नव्याने टाकले जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहिल अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचे प्रयत्न अपयशी ठरले असून, जरांगे यांचे उपोषण सुरूच राहणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली होती . या बैठकीत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ उपस्थित होते यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत सरकारने काही बदल करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली होती.