राज्यातील आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या सुनावणीला आता सुरुवात होत आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणातील सुनावणी १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. एकाच दिवशी शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.
स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहे.वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्यावर ते निर्णय देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जलदगतीने होणार आहे.
साधारण दोन दिवस ही सुनावणी चालेल. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणी आलेल्या ३४ याचिकाही निकाली काढणार आहेत. त्यामुळे येत्या१४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. त्यामुळे या आठ दिवसात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे..