स्वामी विवेकानंद यांनी 130 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिकागो येथे केलेल्या भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 130 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म संसदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण आजदेखील जागतिक एकात्मता आणि सौहार्द राखण्यासाठीचे आवाहन म्हणून ध्वनित होत आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे 130 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी केलेले भाषण, आजच्या काळातदेखील जागतिक एकात्मता आणि सौहार्द राखण्यासाठी केलेले आवाहन म्हणून ध्वनित होत आहे. वाटते. मानवतेच्या जागतिक बंधुत्वावर भर देणारा त्यांचा तो कालातीत संदेश आपल्यासाठी मार्गदर्शन करणारा प्रकाशस्तंभ ठरतो आहे.