गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल सस्पेंड झाले आहे. तशी माहिती अधिकृत ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून तक्रार केल्यानंतर टीम एक्स कडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड करत काही महिन्यांपूर्वी शिवसेना भाजप युतीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी पार्टीत २ गट पडल्यानंतर अजित पवार गटाने आपले ट्विटरवर अधिकृत खाते सुरू केले होते. दरम्यान नियमबाह्य कृती असल्याच्या कारणावरून कार्यवाही करून हे खाते सस्पेंड केले असल्याची टीम एक्स कडून माहिती आहे.