राज्यातील आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या सुनावणीला उद्या सुरुवात होत आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणातील सुनावणी उद्या म्हणजे १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे.त्याच पार्श्वभूमीवर विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांना उद्या वेळेवर हजर राहायच्या सूचना दिल्या आहेत.
एकाच दिवशी शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहे.वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्यावर ते निर्णय देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जलदगतीने होणार आहे. साधारण दोन दिवस ही सुनावणी चालेल. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणी आलेल्या ३४ याचिकाही निकाली काढणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी वकील पत्र अध्यक्षांकडे सादर केला आहे ज्यामध्ये दोन पानी आपलं लेखी म्हणणे वकिलांच्या मार्फत मांडले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे यांच्यामार्फत वकीलपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहे. हे वकील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू मांडतीलअध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना सुनावणी दरम्यान आपलं म्हणणं मांडण्यास विचारले गेल्यास हे आमदार आपली भूमिका मांडतील असे वृत्त समोर आले आहे.