आजपासून शिवसेनेच्या आमदार पात्र-अपात्र प्रकरणाच्या आज सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडणार आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज दुपारी १२ वाजता सुरू झाली. त्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार विधीमंडळात दाखल झाले आहेत.
शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होत आहे. एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल.या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहणे बंधनकारक होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.
सुनावणी पार पडत असताना सर्व आमदारांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे.तसेच, सेंट्रल हाॅलमध्ये सर्वांना मागील बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचिकेप्रमाणे त्या-त्या आमदारांना आणि त्यांच्या वकिलांनी पुढे बोलावून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
विधीमंडळातील सुनावणीत अॅड. असीम सरोदे ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. तर शिंदे गटासाठी निहाल ठाकरे बाजू मांडतील.