शिवराज्यभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त इंदुर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले . यावेळी योगी आदित्यनाथ यांनी भाषणात शिवरायांच्या पराक्रमाची माहिती दिली तसेच सनातन धर्माबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांवर टीका देखील केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव संपूर्ण भारत साजरा करत आहे. आज याची सुरुवात वास्तविकरित्या इंदुरनेच केली आहे. ३५० वर्षांच्या या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना करत, त्या काळातील सर्वात क्रूर आणि बलशाली मुघल साम्राज्याला आव्हान दिले. शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात हिंदवी साम्राज्याची स्थापना केल्याने, आज ३५० वर्षानंतर त्याच सन्मानाने आणि भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण सर्वजण करत आहोत. त्याच गौरवाने करत आहोत, ज्या गौरवाने त्या कालखंडात हिंदवी साम्राज्याच्या प्रति समर्पित प्रत्येक भारतीय त्या कालखंडात करत होता. आज जेव्हा भारतातील प्रत्येकजण जेव्हा राष्ट्रनायकांना आठवतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या श्रद्धेने आणि सन्मानाने घेतलं जातं.असे मुख्यमंत्री योगिनीं