शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत, या निमित्ताने इंदूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर करण्यात आले. हे अनावरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती दिली. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात राजकीय व्यक्तींकडून सनातन धर्मावर जी खालच्या पातळीत वक्तव्ये केली जात आहेत त्याचाही योगिनीं समाचार घेतला.
यावेळी योगी म्हणाले कि, ‘३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी त्या काळातील सर्वात क्रूर आणि बलशाली मुघल साम्राज्याला आव्हान दिले. शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात हिंदवी साम्राज्याची स्थापना केल्याने, आज ३५० वर्षानंतर त्याच सन्मानाने आणि भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण सर्वजण करत आहोत.’