गेल्या काही दिवसांत तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि मंत्री उदयनीधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून देशातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर सारवासारव करताना खुद्द मुख्यमंत्र्यांना त्यांनी हिंदू मंदिराच्या डागडुजीसाठी केलेल्या प्रयत्नाचा दाखल द्यावा लागला होता. यावर राजकीय वर्तुळातून बरीच टीकाही उदयनीधी यांच्यावर करण्यात आली होती! खुद्द हिंदू महंतांनी उदयनिधींच्या शिरच्छेदावर बक्षीसही जाहीर केले होते. पण या सर्व पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे.
I.N.D.I.A आघाडीची स्थापन मुळात सनातन धर्म नष्ट करण्यासाठी झाली असल्याचा घणाघात मध्य प्रदेशातील बीना रिफायनरी प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यकारवेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी केला आहे. ज्या सनातन धर्माने लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंदांना प्रेरणा दिली तोच सनातन धर्म I.N.D.I.A आघाडीला संपवायचा असल्याचे मोदी म्हणाले.