मराठवाड्यातील लोकांना उपयुक्त आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटवणारा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मध्यंतरी मविआ गेला होता, परंतु राजकीय नेत्यांच्या स्वार्थापोटी मराठवाड्याला पोहोचणारी झळ सोडवत पुन्हा हा प्रकल्प नव्याने सुरु होणार आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत या प्रकल्पाला नव्याने मान्यता मिळाली आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड हि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. त्यासाठी तब्बल 49000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आज त्याच योजनेला वेगळ्या स्वरूपात पुनरुज्जीवन देण्यात आले.