वर्षभर ज्या बाप्पाच्या आगमनाची वाट सारा भक्तगण पाहत असतो तो बाप्पा उद्या घरोघरी विराजमान होतोय! या निमित्ताने राज्यातील शहरे सजली आहेत. पुणे मुंबई मधील बाजारपेठा जणू बाप्पाच्या आगमनाने प्रफुल्लित झाल्या आहेत असे चित्र पाहायला मिळते. आज पुण्यासह दादर येथील फुल बाजार विविध रंगाच्या फुलांनी भरलेला पाहायला मिळाला. यावेळी बाजारात झेंडूसह बिजली, शेवंती, गुलछडी, अष्टर, चाफा, मोगरा, कापरी, गुलाब यासह सजावटीसाठी लागणारी अनेक प्रकारांची फुले बाजारात आली आहेत. दरम्यान काही फुलांची आवक वाढल्याने दर कमी झाले असले तरीही सणाच्या निमित्ताने एकूणच फुलांना तेजी पाहायला मिळत आहे!
उद्यापासून पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाच्या निमित्ताने लागणाऱ्या वस्तूंसाठी नागरिकांची बाजारात वर्धन झाली. असून सुशोभीकरणाच्या वस्तूंशिवाय विविध फळांच्या आणि भाज्यांच्या मागणीत ही वाढ झाली आहे. या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे बाजारात एकूणच नवचैतन्य पाहायला मिळत आहेत.