संसदेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. यात महत्वाचे निर्णय होण्याचे संकेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी दिले होते. त्यापैकी एक महत्वाचा विषय सध्या संसदेत चालू आहे. तो विषय म्हणजे महिलांना राजकीय आरक्षण! देशातील महिलांना राजकीय व्यासपीठ मिळावे आणि देशाच्या कल्याणकारी योजनेत महिलांचाही उल्लेखनीय सहभाग असावा या हेतूने हे विधेयक असून याला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. आज सोनिया गांधींनी हा पाठिंबा दर्शवला असून आरक्षण देताना आरक्षित समाजांसाठी राजकीय आरक्षण देण्यात यावे, सरसकट महिलांना आरक्षण नको असा मुद्दा यावी सोनिया गांधींनी उपस्थित केला.
दरम्यान हे विधेयक मंजूर झाल्यास राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास यावेळी सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.