राष्ट्रवादीत बंड होऊन अजित पवार गट राज्यातील सत्तेत सामील झाला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे अत्यंत वेगवान अशी पाहायला मिळाली. सध्या संसदेत विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी करत अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर देत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुळे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘सुप्रिया सुळे अजूनही नैराश्यात आहेत, आम्ही सत्तेत सामील झाल्याचे त्यांना अजूनही पचले नाही’ अशा शब्दात सुनील तटकरे यांनी टीका केली आहे.