सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमाधी दोन्ही गटांमध्ये पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट सातत्याने पक्षात फूट नसल्याचे सांगताना दिसतात. ‘आमचा पक्ष एकसंध असून पक्षात कोणतीही फूट नाही’ असे दोन्ही गटाकडून सांगण्यात येते. परंतु दोन्ही गट एकमेकांवर मोठी टीका करतानाही पाहायला मिळते. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘पक्ष एकसंध आहे हे मान्य असून आता पक्ष बदलला आहे, त्यानुसार अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत’.