शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानभवनामध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर दुसरी सुनावणी पार पडत आहे. त्याला ३ वाजता सुरवात झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात दाखल होत आहेत.
अनिल परब ,सुनिल प्रभू आणि संजय शिरसाट हे विधानभवनात दाखल झाले आहेत.
दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी नको अशी शिंदे गटाने मागणी केल्याचे वृत्त समोर येत आहे.