शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर घेण्यात आलेली आजची सुनावणी संपली आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून पुढची सुनावणी १३ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या संभाव्य वेळापत्रक पत्रकात कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.एकूण याचिका ३४ आहेत, सर्वांच्या याचिकेवर स्वतंत्र युक्तिवाद होणार आहे. त्यामुळं कमीत कमी ४ ते ५ महिने लागण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याने आता जानेवारी २०२४ मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.