उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ रोजी मुंशी शारदाप्रसाद श्रीवास्तव व आई रामदुलारी यांच्या पोटी गालाल बहादूर यांचा जन्म झाला.
हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून संस्कृत भाषेत पदवी घेऊन त्यांनी *शास्त्री* ही उपाधी धारण केली.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशच्या संसदेचे सचिव बनविण्यात आले. १९४७ मध्ये ते पोलीस आणि वाहतूक मंत्रीही होते. त्यांच्याच काळात पहिल्या महिला बस कंडक्टरची नेमणूक करण्यात आली होती.
ते रेल्वे मंत्री असताना झालेल्या एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःहून राजीनामा देणारे हे व्यक्तिमत्त्व.
मंत्री पदावर असतानाही वैयक्तिक कर्ज काढून आपले कौटुंबिक खर्च करणारे लाल बहादुर हे खरोखर अत्यंत निस्पृह आणि निर्भिड होते. उच्च पदावर असूनही त्यांनी आपले चारित्र्य निष्कलंक ठेवले.
१९६४ मध्ये पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर ते भारताचे पंतप्रधान झाले.
*जय जवान जय किसान* हा नारा देऊन शेतकरी व सैनिकांचा सन्मान केला. भारताच्या आर्थिक विकासासाठी काम केले.
दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी त्यांनीच *श्वेतक्रांतीला* प्रोत्साहन दिले.
भारतात अन्नधान्यवृद्धीसाठी त्यांनी *हरितक्रांतीला* प्रोत्साहन दिले.
१९६५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान युध्दात कारवाई करण्यासाठी सेनेला संपूर्ण अधिकार दिले. १९६५ ला भारत पाक युध्द संपले.
१० जानेवारी १९६६ ला रशिया आणि अमेरिकेच्या दबावाखाली भारत पाकिस्तान शांती करारावर स्वाक्षरी करण्यास पाकिस्तानचे राष्ट्रपती *आयुब खान आणि शास्त्री यांची भेट रशियातील ताशकंद येथे झाली*
आणि
भारताचे दुसरे पंतप्रधान असलेल्या या थोर विभूतीचा *११ जानेवारी १९६६ रोजी *ताशकंद कराराच्या रात्रीच रहस्यमय मृत्यू झाला.* आजही त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही.
त्या महापुरुषाला *शतशः नमन*
सौ.उमा वहाडणे ,कोपरगाव जिल्हा नगर
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र