छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले आहेत. दि. 3 ऑक्टोबर,2023 रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.
Tags: NULL