मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नव्हता. तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता. मात्र आज हा पेच सुटला असून पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार असतील, तर चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रीपदे मिळाली आहेत.
पालकमंत्र्यांची सुधारीत यादी खालीलप्रमाणे –
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार