सिक्कीमच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी चर्चा केली आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. या संकटकाळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.
बाधितांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“सिक्कीमचे मुख्यमंत्री @PSTamangGolay यांच्याशी चर्चा केली आणि राज्याच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बाधित झालेल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. ”