बहुप्रतिक्षित अशा वनडे वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होणार आहे.भारतात होणाऱ्या या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. हा विश्वचषक ४८ दिवसांचा असणार आहे. विश्वचषकातील सामने भारतातील दहा वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळले जाणार आहेत.
या स्पर्धेतील पहिलाच सामना हा २०१९ मधल्या फायनलिस्ट टीममध्ये होणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज २ वाजता ह्या सामन्याला सुरवात होणार आहे.
वर्ल्ड कप फायनल २०१९ चा अंतिम सामना आणि सुपर ओव्हरही बरोबरीत सुटला होता. त्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक चौकाराच्या निकषावर विजेता ठरवण्यात आले होते त्यामुळे आता न्यूझीलंडचा पहिल्याच सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वचपा काढण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ९५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ४५ सामने इंग्लंडने तर ४४ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत