प्रत्येकाचा पहिला गुरू त्याची आईच असते.
परंतू माणसाला त्याच्याही पलीकडचे ज्ञान मिळवण्यासाठी गरज असते ती शिक्षक रुपी मार्गदर्शकाची.
विद्यार्थ्याला घडवत असताना त्याच्यावर चांगले संस्कार करणे, चांगले चरित्र घडवणे, त्याच्या मनात थोर व्यक्तींच्या बद्दल आदर, निर्माण करणे. एक आदर्श आणि आज्ञाधारक विद्यार्थी घडवणे. हे शिक्षकाचे काम आहे.पूर्वीच्या काळी भारतात गुरुकुल पद्धती होती.
फार प्राचीन काळापासून आपल्याकडे गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो.
या दिवशी सर्व शिष्य अर्थात विद्यार्थी आपल्या गुरुंना म्हणजेच शिक्षकांना मानवंदना देतात.
आध्यात्मिक किंवा धार्मिक गुरु असतील तर त्यांची पूजा केली जाते. आपल्या गुरूंचा किंवा शिक्षकांचा मानसन्मान ठेवणे हे संस्कृतीला धरूनच आहे. त्यातून नैतिक मूल्यांची वृद्धी होत असते.
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे भविष्य आहेत
आणि या भविष्याला घडवण्याचे काम शिक्षक करतात. मनुष्याच्या आयुष्यातील शिक्षकाचे स्थान लक्षात घेऊन जगभरात दरवर्षी ५ ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन (International Teachers Day) साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात यावा ही यूनेस्कोची शिफारस १९९४ साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर करण्यात आली.
त्यानंतर जगभरात आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात असं मानलं जातं.
या मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं महत्वपूर्ण काम हे शिक्षक करतात आणि त्यांनी केलेल्या या कामावरच देशाचं भविष्य ठरतं.
चांगला समाज घडवण्यात शिक्षकांचे योगदान लक्षात घेता त्यांचा सन्मान म्हणून जगभर शिक्षक दिन साजरा केला जातो.
जागतिक शिक्षक दिन साजरा करताना काही उद्दिष्ट ठरवले जाते.
त्यातून शिक्षकांच्या विविध समस्या, शिक्षकांचा दर्जा आणि त्यांचे अधिकार, शिक्षकांचा सन्मान ठेवण्याची आवश्यकता जागतिक समाजाला पटत असते.
या वर्षीचे जागतिक शिक्षक दिनाचे उद्दिष्ठ आहे
” शिक्षकांचे सक्षमीकरण:
ज्ञानाबरोबरच समाजातली छोट्या मोठ्या गोष्टींचं ज्ञान मिळवून एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवणारा शिक्षक तितकाच सक्षम असणंही गरजेचंच आहे.
संत कबीर म्हणतात
“गुरू कुम्हार शिष कुम्भ है ,
गढ़ गढ़ काढत खोट “!!
अंतर हात सहारा दे ,
बाहर बाहै चोट !!
लता भामरे, कोपरगाव
सौजन्य – समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र