शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील आमदार अपात्रतेची सुनावणी आता एकत्रितपणे पार पडणार आहे. शुक्रवारी १३ऑक्टोबरला ही सुनावणी पार पडणार आहे.
आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या दोन्ही याचिकेवर एकत्र सुनावणी करण्यात येणार आहे.
तर उद्धव ठाकरे यांच्या पक्ष-चिन्ह लढाईवर 11 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती पार्डी वाला आणि मनोज मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ही महत्त्वपूर्ण लढाई असणार आहे. या सुनावणीकडे आता साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे.
तसेच एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याची लढाई सुरू असतानाच आता दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाकडून आमदार अपात्रतेसंबधी याचिका दाखल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शरद पवार यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.