मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. . केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.
मध्यप्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार आहे. यातील छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
या पाच राज्यामध्ये सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहेत . एकूण ६७९ जागांवर मतदान होणार आहे. ६० लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोराममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये २.०३ कोटी, मध्य प्रदेशमध्ये ५.६ कोटी, राजस्थानमध्ये ५.२५ कोटी आणि तेलंगणामध्ये ३.१७ कोटी मतदार मतदान करणार आहेत.