यंदा १ ऑगस्ट रोजी ठाकरे गटाने तर ७ ऑगस्ट रोजी शिंदे गटाने महापालिकेकडं शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळं हे प्रकरण पुन्हा कोर्टात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता यापार्श्वभूमीवर शिंदे गटानं आपला अर्ज मागे घेण्याचे ठरवले असून आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानात मेळावा घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच मेळावा पार पडणार असल्याचं निश्चित झाले आहे.
याबाबत बोलताना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर म्हणाले की , “दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे. एकनाथ शिंदेंचे मत आहे की हिंदूंच्या सणांमध्ये कुठलाही वाद न होता तो आनंदात साजरा व्हावा. कारण सर्वच उत्सव हे आनंदात साजरे व्हावेत, बंधन दूर व्हावीत. हे या शासनाचे धोरणच आहे. त्यादृष्टीनं शिंदेंनी समजूतदाराचं पाऊल म्हणून हा दसरा मेळावा आझाद मैदान आणि क्रॉस मैदानावर व्हावा यासाठी तयारी सुरु केली. तशा प्रकारचे मला निर्देश दिले आहेत “