कंत्राटी पोलीस भरतीच्या विरोधात भीम आर्मी संघटना आक्रमक झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला.
कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ सोलापुरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.