*या देवी सर्व भुतेषु निष्ठा रूपेण संस्थिता।*
*नमः तस्मै, नमः तस्मै, नमः तस्मै,नमो नमः।*
देव देवता म्हणजे शक्ती. नवरात्रि शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे याच नऊ शक्तीचा उत्सव या दिवसात देवी या नऊ रुपाची पूजा, उपासना खुप विधी पुर्वक केली जाते. याचा परिणाम आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक आहे.
शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. दीव्याति इति देवी अशी देवी या शब्दाची उत्पत्ती. तसेच दिव म्हणजे खेळणे. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या सृष्टी, स्थिती, लय, रुपाची क्रीडा देवी करत असते . तिचे अवतार प्रसंगानुरूप सात्विक,राजस, आणि तामस आहे. त्यातील पहिले रुप म्हणजेच शैलपुत्री.
*प्रथमं शैलपुत्री च!*
*वृषारुढां शुलधरा शैलपुत्री यशस्वीनीम ।*
*वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम ।।*
शैलपुत्री म्हणजे हिमालय कन्या पार्वती.
पार्वती म्हटल्यावर प्रथम आठवतं ते तिचं १२ वर्षे केलेलं तप. पित्याप्रमाणे उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेली ही शैलपुत्री, कठोर ध्येय निष्ठा, कठोर परिश्रम, त्याग, श्रध्दा हे गुण तिच्या कडुन आपण घ्यायला हवेत. मनात एक पती म्हणजे ध्येय ठरवले आणि ते पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते सोसण्याची तयारी. कोणी कितीही प्रलोभने दाखवली. तुझं हे ध्येय कसं चुकीचे आहे. हे पटवण्याचा प्रयत्न केला तरी यांना बळी न पडता ध्येयावर ठाम राहणं, निष्ठा ठेवणं हे तिचे महत्वाचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न आजपासून करुयात का?
पार्वती आणि हेमवती हे देखील याच देवीचे अन्य नाव आहे. शैलपुत्री चे लग्न श्री भगवान शंकर यांच्या बरोबर झाले. त्यांचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.
*या देवी सर्व भुतेषु शक्तीरूपेण संस्थीता ।*
*नमः तस्मै, नमः तस्मै, नमः तस्मै नमो नमः ।।*
सौ. ऋचा विवेक धारणगांवकर
कोपरगाव.
सौजन्य – समिति संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत