आज नवरात्रौत्सवाचा दुसरा दिवस
आज देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाची आराधना !!
‘ब्रह्मचारिणी ‘
म्हणजे ब्रह्माचं आचरण करणारी.
शुद्ध, पवित्र, सात्विक….
एखादी स्त्री पाहिल्याबरोबर असं वाटून जातं खरंच ही किती सोज्वळ, सात्त्विक आहे ….
तिच्या बोलण्यातून, वागण्यातून तिच्या संस्कारांचं दर्शन घडतं.
ब्रह्मचारिणी म्हणजे आणखी काय वेगळे असणार ?
आजच्या भाषेत सांगायचं तर भ्रष्टाचार, व्यभिचार या पासून दूर राहणारी,
मुलांना सत्यता, सहिष्णुतेचे संस्कार देणारी,
प्रसंगानुरुप कोमल आणि कठोर बनणारी,
स्वतः जिजाऊ बनून मुलाला शिवाजी बनवण्याचा प्रयत्न करणारी,
मुलीला चारित्र्यसंपन्न बनवणारी,
तसेच मुलाला स्त्री चा सन्मान करण्यास शिकवणारी,
स्वतः कुठलेही दुष्कृत्य न करता कुणालाही ते करण्यास रोखणारी..
अशा या देविरुपाची आराधना करायची आहे.
म्हणजेच हे सत्वगुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे.
या देवी सर्व भूतेषु मातृरुपेण संस्थिता ।
नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः
नेहा जोशी, कोपरगाव
सौजन्य – समिति संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत