या देवी सर्व भूतेषु
विष्णुमायेति शब्दीता।
नमः तस्यै नमः तस्यै
नम तस्यै नमो नमः ||
नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते.
स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याचे मानले जाते.कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची जबाबदारी पार पडला होती.
कुमार कार्तिकेयांना ‘स्कंद ‘ असेही नाव आहे.
म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. या रूपाच्या पूजनाने कार्तिकेय आराधना ही घडते अशी मान्यता आहे.
स्कंदमाता चतुर्भुज आहे.
कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे.
देवीचे वाहन सिंह आहे. शौर्य आणि करुणा दोन्हीही देवीच्या या रूपात दिसतात.स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे.
देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जुन वापर केला जातो.
नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पद्मासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते.
**सिंहासनगता नित्य* *पद्माश्रितकरद्वया।*
*शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता* *यशस्विनी।।**
सलोनी गुजराथी, कोपरगाव
सौजन्य – समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र