राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात ‘आरएसएस’साठी दसरा हा खास दिवस आहे. या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. आरएसएसचे कार्यकर्ते या सोहळ्यात शिस्तबद्धरित्या सहभागी होतात. सरसंघचालक मोहन भागवत रेशीमबाग मैदानात दाखल झाले आहेत.
सरसंघचालक यांच्या हस्ते शस्त्र पूजन नंतर स्वंयसेवकांच्या शारीरिक कवायती आणि प्रात्यक्षिक होतील. त्यानंतर प्रमुख पाहुणे शंकर महादेवन यांचे आणि अखेरीस सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे उद्बोधन होईल.
संघाच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेत पुढील वर्षातील कार्याची दिशा सरसंघचालकांच्या उद्बोधनातून स्पष्ट होत असते.संघाच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने पुढील वर्ष अत्यंत महत्वाचे असून संघ शताब्दी वर्षात कोणत्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.